चिंतोपंतांच्या जगात…

जून 8, 2007

चिंतोपंत उवाच…

Filed under: Uncategorized — Shreyas @ 9:25 सकाळी

नमस्कार! आम्ही चिंतोपंत, म्हणजेचचिंतामणराव घालमेलकर’. तसं पाहीले तर हे काही आमचे पाळण्यातलं नाव नाही, पण पाळण्यापासूनच आमच्या मस्तकावर असलेली ठळक ललाटरेषा(ही आमची जन्मखूण!) पाहून, अप्पांनी (आमचे तीर्थरूप) आमचे नामकरणचिंता-मण’ असे केले. असो! नावात काय आहे? तर सांगायचा मुद्दा असा, की आम्हास लेखनाचा हा नवा छंद जडला आहे. अखंड मराठी भाषेलाआपलेच’ कुरण समजून, आमची लेखणीरूपी बकरी त्यावर मनसोक्तपणे चरविण्याचा अमुचा हा सालस प्रयास, आपण गोड करून घ्यावा! आपल्या टीका आणि सूचना यांची आम्ही नेहमीच आतुरतेने वाट पाहू. कळावे.

आपला चिंतोपंत

goat.jpg

१ प्रतिक्रिया »

  1. राजमान्य राजेश्री श्रीयुत चिंतोपंत घालमेलकर यांना नूतन ब्लॉगारंभानिमित्त शुभेच्छा.–शुद्धमती राठी.

    Comment by Shuddha Marathi — जुलै 23, 2007 @ 7:45 सकाळी


RSS feed for comments on this post. TrackBack URI

यावर आपले मत नोंदवा

Blog at WordPress.com.